सेरेना की व्हीनस? कोण गाठणार यंदाच्या यूएस ओपनची सेमीफायनल? याच उत्सुकतेनं टेनिसचाहत्यांनी न्यूयॉर्कच्या आर्थर अॅश स्टेडियमवर गर्दी केली आणि अपेक्षेप्रमाणेच त्यांना पहायला मिळाली एक नाट्यमय लढत.
बॅटल ऑफ विल्यम्समध्ये अखेर धाकटी बहीण सेरेनानं बाजी मारली. आणि विम्बल्डन फायनलमधल्या पराभवाचा वचपा काढला. पण व्हीनसनं सेरेनाला हा सामना जिंकण्यासाठी बराच घाम गाळायला लावला.
खरंतर या सामन्यात दोन्ही सेट्समध्ये सुरूवातीला व्हीनसनंच आघाडी घेतली होती. पण हार मानेल तर ती सेरेना कसली? पहिल्या सेटमध्ये १ - ३ अशा पिछाडीनरून मुसंडी मारताना सेरेनानं आपली जिद्द दाखवून दिली. टायब्रेकरमध्ये गेलेला पहिला सेट सेरेनानं ८-६ असा जिंकला.
एकीकडे शांत व्हीनस आणि दुसरीकडे आक्रमक सेरेना यांच्यातली ही लढाई दुस-या सेटमध्ये आणखीनच चुरशीची ठरली. व्हीनसचा प्रत्येक फटका सेरनानं तितक्याच ताकदीनं परतवून लावला. चाहतेही एकाच वेळी “Come on Williams” म्हणून दोघींनाही चीअर करत होते. टायब्रेकरमध्ये पुन्हा एकदा व्हीनसनं आघाडी मिळवली पण ती कायम राखण्यात मात्र तिला अपयश आलं. सेरेनानं हाही सेट आणि सामना 7-6, 7-6 असा आपल्या नावे केला.
पण व्हीनसला जणू सामन्याची उत्सुकता थोडी आणखी ताणायची होती. म्हणूनच तिनं पंचांच्या निर्णयाला आव्हान दिलं. अखेर कौल सेरेनाच्या बाजूनं लागला आणि दोन्ही बहीणींनी सुटकेचा निश्वास टाकला. कारण क्वार्टर फायनलची ही लढत म्हणजे दोघी बहीणींमध्ये आजवर झालेल्या लढतींमधली सर्वात टफ फाईट होती. (खरंच, असं एकमेकींचा सामना करताना कसं वाटत असेल दोघींना? एक मात्र खरं, मलाही त्यांच्यासारखी बहिण असणं आवडलं असतं.) अवघ्या दोनच महिन्यांपूर्वी विम्बल्डनच्या फायनलमध्ये दोघींची गाठ पडली होती. त्यानंतर अमेरिकन ओपनमध्ये घरच्याच मैदानात एकमेकींचा सामना करणं व्हीनस आणि सेरेनासाठी सर्वात मोठं आव्हान होतं. पण सामना संपला आणि मैदानावरच्या या दोन प्रतिस्पर्धी पुन्हा एकमेकींच्या मैत्रिणी झाल्यायत- अर्थात पुन्हा एकमेकींसमोर उभ्या राहीपर्यंतच..

No comments:
Post a Comment