मुंबई, भारताची आर्थिक राजधानी, पुन्हा एकदा अतिरेकी हल्ल्याची बळी ठरलीय. यावेळी मुंबईवर झालेला हल्ला हा भारताच्या इतिहासातला आजवरचा सर्वात मोठा हल्ला ठरलाय. पण याआधीही अनेकदा भारताला दहशतवादाची झळ बसलीय. आणि गेल्या पंधरा वर्षात तर अतिरेक्यांच्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालीय.
1. 12 मार्च 1993, मुंबई
दुपारी १.३० ते ३.४० या कालात मुंबईत 12 ठिकाणी 13 बॉम्बस्फोट. बॉम्बस्फोटांच्या या मालिकेत 257 जणांनी जीव गमावला तर 700 जण जखमी झाले. या हल्ल्यांमागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम चा हात होता.
2. 14 फेब्रुवारी 1998, कोईंबतूर
कोईंबतूरमध्ये ११ ठिकाणी झालेल्या १३ बॉम्बस्फोटांत ४६ मृत्यृमुखी आणि २०० जखमी
कोईंबतूरमध्ये ११ ठिकाणी झालेल्या १३ बॉम्बस्फोटांत ४६ मृत्यृमुखी आणि २०० जखमी
3. 1 ऑक्टोबर 2001, श्रीनगर
जम्मू आणि काश्मीर विधानसभा परिसरात सशस्त्र अतिरेक्यांचा हल्ला. ३५ जण मृत्युमुखी. हल्ल्यामागे इस्लामिक दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा हात.
जम्मू आणि काश्मीर विधानसभा परिसरात सशस्त्र अतिरेक्यांचा हल्ला. ३५ जण मृत्युमुखी. हल्ल्यामागे इस्लामिक दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा हात.
4. 13 डिसेंबर 2001, नवी दिल्ली
भारतीय लोकशाहीचं प्रतिक असलेल्या संसदभवनावर सशस्त्र अतिरेक्यांचा हल्ला. 12 जण मृत्युमुखी तर १८ जण जखमी. जगभरातून हल्ल्याचा मोठ्या प्रमाणावर निषेध. हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचा हात असल्याचं स्पष्ट झालं, दोन्ही देशांमधील संबंधांत तणाव वाढला.

5. 24 सप्टेंबर 2002, गांधीनगर
अक्षरधाम मंदिरावरील हल्ल्यात 31 जणांचा मृत्यू तर 79 जण जखमी.
अक्षरधाम मंदिरावरील हल्ल्यात 31 जणांचा मृत्यू तर 79 जण जखमी.
6. १४ मे 2002
जम्मूजवळ सैन्यदलाच्या तळावर सशस्त्र अतिरेक्यांचा हल्ला, 30हून अधिक जणांचा मृत्यू.
7. डिसेंबर 2002 ते मे 2003, मुंबई
या आठ महिन्यांच्या काळात मुंबई चार वेळा बॉम्बस्फोटांनी हादरली. मुंबईला हादरवणा-या या स्फोटांमागे स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमीचा हात असल्याचा आरोप.
8. २५ ऑगस्ट 2003, मुंबई
दुपारच्या वेळी गेट वे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार इथं टॅक्सीत बॉम्बस्फोट. किमान 52 जण मृत्युमुखी तर 150 जण जखमी. पहिला बॉम्बस्फोट गेट वे ऑफ इंडिया समोरील ताज महाल हॉटेलच्या बाहेर पार्क केलेल्या टॅक्सीत झाला. तर दुसरा बॉम्बस्फोट झवेरी बाजारात मुंबादेवी मंदिर परिसरात झाला.

2 डिसेंबर 2002 - घाटकोपर रेल्वे स्टेशनबाहेर बेस्ट बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला तर 31 जण जखमी.
6 डिसेंबर 2002 - मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर मॅकडोनाल्ड्सच्या रेस्टॉरंटमध्ये बॉम्बस्फोट. 25जणांना जखमी करणारा हा बॉम्ब रेस्ट़ॉरंटच्या एऱकंडिशनिंग सिस्टिममध्ये ठेवण्यात आला होता.
27 जानेवारी 2003 - विलेपार्ले स्टेशनबाहेर संध्याकाळी गर्दीच्या वेळी सायकल बॉम्बचा स्फोट, एका महिलेचा मृत्यू तर 30जण जखमी.
13 मार्च 2003 - मुलुंड रेल्वेस्थानकात कर्जत लोकलमध्ये बॉम्बस्फोट. संध्याकाळी साडेआठच्या सुमारास अत्यंत गर्दीच्या वेळी झालेल्या या स्फोटानं ११ प्रवाशांनी आपला जीव गमावला. मुंबईची जीवनवाहिनी असणा-या लोकल ट्रेनला पहिल्यांदाच लक्ष्य करण्यात आलं.
8. २५ ऑगस्ट 2003, मुंबई
दुपारच्या वेळी गेट वे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार इथं टॅक्सीत बॉम्बस्फोट. किमान 52 जण मृत्युमुखी तर 150 जण जखमी. पहिला बॉम्बस्फोट गेट वे ऑफ इंडिया समोरील ताज महाल हॉटेलच्या बाहेर पार्क केलेल्या टॅक्सीत झाला. तर दुसरा बॉम्बस्फोट झवेरी बाजारात मुंबादेवी मंदिर परिसरात झाला.
9. 15 ऑगस्ट 2004, आसाम
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी धेमाजी इथं झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये 16 जम मृत्युमुखी. जखमी आणि मरण पावलेल्यांमध्ये लहान मुलांचा मोठा समावेश.
10. 5 जुलै 2005, अयोध्या
रामजन्मभूमी परिसरात सशस्त्र अतिरेक्यांचा हल्ला.
11. 29 ऑक्टोबर 2005, दिल्ली
दक्षिण दिल्लीमध्ये बाजार परिसरात तीन बॉम्बस्फोट. दिवाळीच्या दिवशी झालेल्या या बॉम्बस्फोटांमध्ये 59 जण मृत्युमुखी तर 200 जखमी. पाकिस्तानस्थित इस्लामिक इन्कलाब माहेझ या अतिरेकी संघटनेनं हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली.
12. 7 मार्च 2006
उत्तर प्रदेशातील वाराणसी या तीर्थक्षेत्री बॉम्बस्फोट, 28 मृत्युमुखी तर 101 जखमी. हल्ल्यामागे पाकिस्तानशी निगडीत दहशतवादी संघटनांचा हात असल्याचा भारतीय पोलिसांचा दावा.
13. 11 जुलै 2006, मुंबई
पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेन्समध्ये सात बॉम्बस्फोट. संध्याकाळी गर्दीच्या वेळी झालेल्या या स्फोटांमध्ये 200 जणांनी आपला जीव गमावला. हाही हल्ला म्हणजे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांचं कारस्थान असल्याचं तपासात उघड.
14. 8 सप्टेंबर 2006, मालेगाव
मालेगावमध्ये मस्जिद परिसरात बॉम्बस्फोटांची मालिका. 37 मृत्युमुखी तर 125 जखमी. जखमींमध्ये अनेक मुस्लिम यात्रेकरूंचा समावेश.
15. 18 मे 2007, हैदराबाद
मक्का मस्जिद इथं शुक्रवारच्या नमाजच्या वेळी बॉम्बस्फोट. १३ जण मृत्युमुखी. बॉम्बस्फोटांनंतर झालेल्या दंगलींमध्ये पोलिसांच्या कारवाईत 4 जणांचा मृत्यू.
16. 26 मे 2007, आसाम
गुवाहाटीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी.
17. 10 जून 2007, मणिपूर
म्यानमारच्या सीमेजवळील मोरेह इथं सशस्त्र अतिरेक्यांचा गोळीबार, ११ जण मृत्युमुखी.
18. 25 ऑगस्ट 2007, हैदराबाद
लुंबिनी पार्क आणि गोकुळ चाट भवन इथं बॉम्बस्फोट, 42 जणांचा मृत्यू तर 50 जण जखमी. या दोन्ही बॉम्बस्फोटांमागे हरकत-उल-जिहाद-इ-इस्लामी अर्थात हुजीचा हात होता.
19. 23 नोव्हेंबर 2007
उत्तर प्रदेशात सहा बॉम्बस्फोटांची मालिका. वाराणसी, फैजाबाद आणि लखनौ या तीन शहरांना लक्ष्य बनवण्यात आलं. वाराणसीत तीन ठिकाणी, फैजाबादमध्ये दोन तर लखनौमध्ये एक बॉ़म्बस्फोट, 13 जणांनी जीव गमावला तर 60 जण
20. 13 मे 2008, जयपूर
परदेशी पर्यटकांचं आकर्षण असलेल्या या शहरात सहा बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत 63 जणांचा मृत्यू आणि 150हून अधिक जण जखमी.
21. 25 जुलै 2008, बंगळूर
भारतीय आयटी उद्योगाचं मोठं केंद्र असलेलं बंगळूर एरवी शांत शहर म्हणून प्रसिद्ध आहे. पण चार महिन्यांपूर्वी इथं झालेल्या सात बॉम्बस्फोटांच्या मालिकेनंतर भारतात कोणतही शहर सुरक्षित नसल्याचंच दिसून आलं. या बॉम्बस्फोटांमध्ये एकाचा मृत्यू झाला तर 150 हून अधिक जण जखमी झाले.
22. 26 जुलै 2008, अहमदाबाद
बंगळूरनंतर अवघ्या एका दिवसात आणखी एक भारतीय शहर दहशतवाद्यांच्या हल्ल्याची शिकार बनलं. या हल्ल्यात 45 जण जखमी झाले तर 150हून अधिक जण जखमी झाले. इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेनं अहमदाबादमधील या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.
23. 13 सप्टेंबर 2008, नवी दिल्ली
बाजार परिसरात पाच ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाला तर 100 जण जखमी झाले. इंडियन मुजाहिदीन संघटनेनं याही हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.
24. 27 सप्टेंबर 2008, नवी दिल्ली
बाजार परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू.
बाजार परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू.
25. 30 ऑक्टोबर 2008, आसाम
भाऊबीजेच्या दिवशी पश्चिम आसाममध्ये गुवाहाटी आणि आसपासच्या परिसरात 13 बॉम्बस्फोट. 61 जणांचा मृत्यू तर 300 जण जखमी.
भाऊबीजेच्या दिवशी पश्चिम आसाममध्ये गुवाहाटी आणि आसपासच्या परिसरात 13 बॉम्बस्फोट. 61 जणांचा मृत्यू तर 300 जण जखमी.
26. 26 नोव्हेंबर 2008, मुंबई
देशाची आर्थिक राजधानी पुन्हा एकदा अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर. एके 47 रायफल्स आणि ग्रेनेड्सनं सज्ज सशस्त्र अतिरेक्यांचा मुंबईवर हल्ला. दक्षिण मुंबईत विविध ठिकाणी अंदाधुंद गोळीबार, ताज महाल आणि ओबेरॉय (ट्राय़डेन्ट) या फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये अतिरेक्यांनी परदेशी नागरिकांना ओलीस धरलं.
No comments:
Post a Comment